समीक्षा

साहित्यसमीक्षा : सिद्धांत आणि व्यवहार

(Sahityasamiksha : Siddhant Ani Vyavhar)

लेखक : म. सु. पाटील

प्रकाशन : शब्द

साहित्याचा आस्वाद घेणे, साहित्याचे अध्ययन-अध्यापन करणे आणि साहित्याची चिकित्सा करणे या तीन वेगवेगळ्या पातळींवरच्या कृती असल्या तरी मूलतः वाचनाशीच निगडित आहेत. सकस साहित्य आणि पर्यायाने समाज घडण्यासाठी त्या आवश्यकही आहेत. चांगला वाचक निर्माण होणे आणि साहित्यव्यवहार सशक्त राहणे यासाठी या बाबींचे महत्त्व अभ्यासकांनी जाणून घेऊन कृतीत उतरवणे म्हणूनच गरजेचे ठरते.

समीक्षेच्या वेगवेगळ्या पद्धती, भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार, साहित्य आणि समीक्षा यांचा कालानुक्रमिक अभ्यास, साहित्यात वेगवेगळ्या काळांत निर्माण झालेले प्रवाह, ते रुळल्यानंतर त्यांना प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेले प्रवाह, एका साहित्यकृतीचे विविधप्रकारे अर्थनिर्णयन या सगळ्याचा विचार साहित्यकृतीची समीक्षा करताना व्हायला हवा. पूर्वसुरींनी करून ठेवलेला अभ्यास आणि त्यांच्या निकषांच्या आधारे आपण साहित्याचा सांगोपांग अभ्यास करणे हे आपल्या पुढील पिढीसाठीही गरजेचे आहे. साहित्याच्या अभ्यासकाची ही जबाबदारी आहे. प्रस्तुत पुस्तकातील समीक्षा-लेखांमधून हे जबाबदारीचे भान एक वाचक म्हणून नक्कीच निर्माण होते. यासाठीच म. सु. पाटील यांचे हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.


(out of stock)

MRP ₹385 ₹345 (40₹ Discount)