
(Sahityakrutinche Vachan Ani Nirvachan)
लेखक : म.सु.पाटील
प्रकाशन : शब्द
येथील साहित्यकृतींचे म. सु. पाटील यांनी केलेले वाचन सूक्ष्म आहे आणि अर्थनिर्णयन बहु-अंगी आहे. त्यांची समीक्षा त्या त्या साहित्यकृतीचा सखोल वेध घेते आणि तिला यथोचित न्याय देते. ही समीक्षा अर्थनिर्णयन करताना साहित्यकृतीच्या मागणीप्रमाणे मानसशास्त्रीय, आदिबंधात्मक, रूपनिष्ठ इत्यादी समीक्षादृष्टींचा जसा अवलंब करते, तसाच जगणे आणि भाषेतील जगणे यांचाही विचार करते. अशा भाषेमध्ये मधून मधून ज्या फटी दिसतात त्यांत डोकावण्याचे आणि दडलेला वा दडवलेला अर्थ हुडकण्याचे व त्यामागील तृष्णांचा शोध घेण्याचे कामही ही समीक्षा करते.
MRP ₹375 ₹335 (40₹ Discount)