
(Badalate Kavisanvedan)
लेखक : म.सु.पाटील
प्रकाशन : शब्द
तुमचा 'कवितारती'मधला शंकर रामाणींवरचा अभ्यासपूर्ण प्रदीर्घ लेख वाचला. अतिशय आवडला. तुमचे सर्व लेखन असे साहित्यिकाच्या सर्वांगाला स्पर्श करणारे, सांगोपांग असतेन्याचा अचंबा आणि हेवा वाटतो. तुम्ही नुसते समीक्षक नाही तर खोल अर्थाने अभ्यासक आहात आणि आजपर्यंत आपल्या व्रताला ढळ पोहचू दिला नाहीत याचे समाधान आणि हेवा वाटतो. शंकर रामाणी तसे आकलनाला सुलभ कवी नाहीत. ते गूढ गहन सहजदृष्टी लाभलेले अनवट कवी आहेत. म्हणून सवग रसिक, त्यांच्या थाऱ्याला थांबत नाहीत. या प्रकारच्या कवीच्या वाटेला काव्यसाधकच जाऊ घजतो तशी तुमची प्रकृती आहे.
- प्राचार्य म. द. हातकणंगलेकर याच्या एका पत्रातून
MRP ₹300 ₹270 (10% Discount)