
(Kadambari : Ek Sahityaprakar)
लेखक : हरिश्चंद्र थोरात
प्रकाशन : शब्द
कादंबरीच्या सिद्धान्तव्यूहाचा वेध घेताना मला दोन सैद्धान्तिक पवित्र्यांची बहुमोल मदत झाली आहे. त्यांतील एक पवित्रा मार्क्सच्या कल्पनाप्रणाली या संकल्पनेमधून साक्षात होतो व कादंबरीसह समग्र संस्कृतीकडे पाहण्याची दृष्टी देतो. मार्क्सवादाशी या निमित्ताने आलेला संबंध मी माझ्या पुढच्या लेखनात विकसित करत नेला आहे.
दुसरा सैद्धान्तिक पवित्रा मिखाईल बाख्तीन या रशियन तत्त्वज्ञाच्या संवादवाद या भूमिकेशी संबंधित आहे. मी मांडलेला कादंबरीचा सिद्धान्तव्यूह मार्क्सवादी दृष्टीकडे कललेला होता आणि कादंबरीचे साहित्यशास्त्र संरचनावादी दृष्टिकोणातून साकार झालेले होते. या दोहोंमध्ये संबंध जोडण्याचे आव्हान अत्यंत अवघड असे होते. त्यासाठी मी कादंबरीच्या भाषेचे विवेचन बाख्तीनच्या दृष्टिकोणातून केले आहे. एकोणीसशे तीसच्या आसपासच सोस्यूरच्या भाषाविचाराची सखोल चिकित्सा करणाऱ्या बाख्तीनच्या मांडणीमुळे बंदिस्त संरचनावादी दृष्टी मला खुली करून घेता आली आणि मार्क्सची कल्पनाप्रणाली कादंबरीच्या संभाषितात पाहता आली. बाख्तीनचा संवादवादही माझ्या पुढच्या लेखनात मुरलेला आहे.
हा ग्रंथ लिहून झाल्यानंतरच्या आजवरच्या काळात कादंबरी या साहित्यप्रकाराला मूर्त सामाजिक परिस्थितीशी जोडण्याचा मी प्रयत्न करीत आलो आहे. कादंबरीच्या सिद्धान्तव्यूहाच्या कक्षा वाढवत नेण्याचा आणि खोलवर पोहोचवण्याचाच हा उपक्रम आहे. यामुळेच माझ्या दृष्टिकोणातून कादंबरी : एक साहित्यप्रकार हा एका दीर्घ प्रवासाचा प्रारंभ ठरतो.
- हरिश्चंद्र थोरात
(out of stock)
MRP ₹800 ₹680 (120₹ Discount)