
(Tipu Sultan : Patrasar Sangrah Ani Adnyapatre)
लेखक : संपा. सरफराज अहमद
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
"राज्य हे लोकांचे असते आणि आपण त्या राज्याचे विश्वस्त आहोत, हे मूलभूत सत्य आपण समजू शकत नाही का?"
"आपल्या प्रजेशी भांडणे म्हणजे स्वतःशीच युद्ध करण्यासारखे आहे, प्रजा आमची संरक्षक आणि ओळख आहे. आणि प्रजेनेच आम्हांला सर्व काही दिले आहे. आपल्यातील शत्रुत्वाची भावना विदेशी वैऱ्यांसाठी राखून ठेवाल?"
"फारोनी त्यांच्या गुलामांच्या श्रमांद्वारे पिरॅमिड्स बांधून घेतली. चीनची प्रचंड भिंतदेखील मजूर स्त्री-पुरुषांच्या रक्तामांसाने माखलेली आहे. कारण त्यांनी मजुरांकडून फटक्याचा धाक दाखवून काम करवून घेतले. रोम, वैविलॉन कार्येजच्या भव्य वास्तू बांधल्या जाव्यात यासाठी हजारो मजुरांचे रक्त सांडले. कैक जण मरण पावले. कोणतीही महान कलाकृती असो वा स्मारक... ज्यांनी ती बांधण्याचे आदेश दिले त्यांच्यापेक्षाही ती स्मारकं बांधताना मरण पावलेल्या मजुरांच्या वेदना, श्रम, अश्रू आणि रक्त यांची ती स्मारकं आहेत."
"आपल्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक आणि नैतिक भल्यासाठी दारू गाळण्यावर आणि विक्रीवर पूर्ण बंदी असेल."
"मलबारच्या स्त्रियांना स्तन उघडे ठेवून फिरताना पाहून मला वाईट वाटले. यामुळे त्यांचे सौदर्य आणि समाजातील नैतिकताही संपते. अशा परंपरा वाईट आहेत. या जमातीच्या धार्मिक नेत्यांसोबत संवाद साधा. ही प्रथा कशी नष्ट करता येईल ते पाहा. या जमातीच्या रूढींमुळे पुरुषांवरही अशी बंधने लादली जातात का? नसेल तर स्त्रियांवरच असा अन्याय करणे वाईट आहे."
(टिपू सुलतान यांच्या आज्ञापत्र आणि पत्रांतून)
MRP ₹575 ₹475 (100₹ Discount)