सामाजिक

नि:शब्द झुंज

(Nishabda Zunj)

लेखक : रेणु गावस्कर

प्रकाशन : शब्द

नका, नका आयावाया 

नका करू माझी कीव 

झालं माझं समाधान 

आता माझा माले जीव.


वहिणाबाईच्या जीवनानुभवातून सिद्ध झालेल्या या शब्दांना प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात उत्तरविणाऱ्या अनेक स्त्रिया रेणू गावस्करांना त्यांच्या वाटचालीत भेटल्या. सुरुवातीला वंचित मुलांच्या परिघातला एक भाग म्हणून समोर आल्या. पुढे पुढे अनेक सामाजिक प्रश्नांच्या संदर्भानिशी असंख्य स्त्रियांशी गाठीभेटी होत राहिल्या. कितीकांशी जिवाभावाचे मैत्र जडले.

यातील अनेक स्त्रियांना समाजानं 'सामान्य' हीच उपाधी दिली होती. पण या 'सामान्य' स्त्रियांनी संकट दत्त म्हणून समोर उभं राहताच दिलेली झुंज खऱ्या अर्थानं 'असामान्य' होती. 'अबला' समजल्या जाणाऱ्या या प्रबलांनी वेळ येताच, परिस्थितीशी झगडतांना जे अतुलनीय धैर्य दाखवलं, त्यातून या स्त्रियांनी लेखिकेच्या मनात स्थान पटकावलं. व्यसनांशी झगडणाऱ्या स्त्रिया असोत, की शरीरविक्रयाच्या व्यवसायात सापडल्यावरही आपली मूल्यं जिवापाड जपणाऱ्या स्त्रिया असोत, या तेजस्विनींच्या दर्शनानं लेखिकेचं मन दिपून गेलं खरं! या स्त्रियांचं असामान्यत्व, त्यांचं धैर्य आणि चातुर्य शब्दबद्ध करायला हवं, समाजात अशा स्त्रियांचं यथोचित कौतुक व्हायला हवं, असं रेणू गावस्करांमधील लेखकाला वाटलं. हे पुस्तक म्हणजे रोजच्या व्यवहारात सामान्य म्हणून समजल्या गेलेल्या स्त्रियांचं अनोखं दर्शन आहे. त्यांनी आपापल्या जीवनात दिलेल्या निःशब्द झुंजीचा हा शब्द आलेख आहे.

MRP ₹175 ₹140 (35₹ Discount)