(Nivadak Pu. Bha. Bhave)
लेखक : पु. भा. भावे
प्रकाशन : साहित्य अकादमी
पु. भा. भावे जीवनाचे भाष्यकार आहेत. मानवाच्या बऱ्यावाईट सर्व प्रवृत्तींचा आलेख त्यांनी आपल्या साहित्यातून उभा केला आहे. जीवनाचे स्वतःला झालेले दर्शन भावे आपल्या साहित्यातून घडवितात व जीवनाच्या सर्व कंगोऱ्यांसह ते वाचकांच्या दृष्टीपुढे उभे करतात. वास्तविक भाव्यांची अशी एक निश्चित जीवनदृष्टी आहे व ती त्यांच्या लेखनामधून वारंवार डोकावतेही. परंतु ह्या जीवनदृष्टीच्या दडपणाखाली आपल्या लेखनाचे कलात्मक मूल्य उणावणार नाही, याची दक्षता ते जाणीपूर्वक घेतात. विचारसरणीने जीवनवादी असलेले भावे हाडाचे कलावंत आहेत. त्यांच्या सगळ्याच लिखाणात एक प्रकारचा कैफ आहे. एक देखणी धुंद मस्ती आहे. आणि याचमुळे त्यांचे साहित्य उत्कट व मर्मस्पर्शी झाले आहे.
मराठी कथेच्या कक्षा विस्तृत करणारे, मराठी कथेला सूक्ष्मतेचे व काव्यमयतेचे एक नवे परिमाण बहाल करणारे एक आघाडीचे कथालेखक म्हणून उभा महाराष्ट्र पु. भा. भावे यांना ओळखत असला तरी कादंबरीकार म्हणूनही ते मोठे आहेत. नाटककार आणि चित्रपटकथालेखक म्हणूनही त्यांनी उदंड यश मिळविले आहे. आपल्या युयुत्सू लेखणीने त्यांनी एके काळी वृत्तपत्रसृष्टी गाजवून सोडली आहे. आपल्या खोचक विनोदाने त्यांनी खदखदून हसवलेही. त्यांच्या या विविधरंगी साहित्याचा निवडक भाग या संग्रहात एकत्रित करण्याचा प्रयत्न तितक्याच समर्थपणे वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे व राम शेवाळकर या संपादक द्वयाने केला आहे.
(out of stock)
MRP ₹200 ₹160 (40₹ Discount)