(Nivadak Kafka)
लेखक : फ्रांज काफ्का
प्रकाशन : साहित्य अकादमी
फ्रान्त्स काफ्का (१८८३-१९२४) ह्या लेखकाचं जर्मन भाषेतलं लिखाण बहुचर्चित आहे. आपल्या उण्यापुऱ्या एकेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यानं गद्य वेचे, कथा, दीर्घ कथा, कादंबऱ्या लिहिल्या आणि टीकात्मक लेखन केलं, रोजनिशी आणि असंख्य पत्रं लिहिली. त्याच्या कथा आणि पुस्तकांचं साहित्यिक वर्तुळात तेव्हाही नाव होतं. त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेल्या साहित्याला, विशेषतः कादंबऱ्यांना अफाट प्रतिसाद मिळाला. गेल्या पन्नास वर्षांत काफ्कावर आणि त्याच्या साहित्यावर किती लेख आणि ग्रंथ लिहिले गेले असतील, याची मोजदाद करणंही कठीण आहे. काफ्काचं लिखाण असं गुंतवणारं, ग्रासून टाकणारं, ओढ लावणारं आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलं गेलेलं काफ्काचं साहित्य एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही आपली मनाची पकड घेतं, आकर्षक व्यापकता हे त्याच्या साहित्याच्या प्रसाराचं आणि प्रसिद्धीचं महत्त्वाचं कारण आहे. काफ्काचं लिखाण बहुतांशी त्याच्या स्वतःच्या जीवनानुभवाशी अत्यंत जवळचं नातं सांगणारं असलं, तरी त्यात स्थल-कालाच्या सर्व मर्यादा ओलांडण्याची जबरदस्त ताकद आहे. काफ्काचं साहित्य वाचकाच्या वर्तमानाशी पटकन नातं जोडतं. मराठी वाचकालाही आपल्या जीवनानुभवाचं प्रतिबिंब त्यात दिसेल.
(out of stock)
MRP ₹240 ₹195 (45₹ Discount)