कादंबरी

व्यासांचा वारसा

(Vyasancha Varasa)

लेखक : आनंद विनायक जातेगावकर

प्रकाशन : शब्द

काळाच्या सागरावर सफरीला निघालेला व्यास नावाचा म्हातारा. त्याच्या गळाला लागला महाकाय देवमासा आमच्यासारख्यांनी त्याला 'महाभारत' म्हटलं आमच्यातल्या चिकित्सकांनी त्याला 'भारत' म्हटलं अतिचिकित्सकांनी त्याला 'जय' म्हटलं. पिढ्यांपासून पिढ्या व्यासांची होडी खेचत नेणारा देवमासा या झुंजीत व्यास त्या देवमाशाशीच बोलायचे 'किती वेळ खेचशील? खेच. मी तुला किनाऱ्यावर घेऊन जाणार' शेवटी केव्हातरी ही खेचताण संपली आणि आम्ही? आम्ही त्यावर तुटून पडलो...

कुणी महाभारत नावाचा हा अजब कॅलिडोस्कोप थोडा फिरवला आणि जाहीर केलं, महाभारत हा सूडाचा प्रवास आहे...

महाभारत काल्पनिक की खरं यावर आम्ही काथ्याकूट केला. हा विचारच गैरलागू, हे मात्र आम्हाला व्यासांच्या सान्निध्यात राहूनही सुचलं नाही.


MRP ₹300 ₹270 (10% Discount)