
(Vishamtecha Puraskarta Manu)
लेखक : डॉ. प्रदीप गोखले
प्रकाशन : मुक्ता प्रकाशन
मनुस्मृती हा भारतातील वैदिक परंपरेने, प्रमाण मानलेला एक ग्रंथ आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर अन्यायाचे समर्थन असूनही आजही प्रतिगामी शक्तींकडून या ग्रंथाचा गौरव केला जाताना दिसतो. अशा स्थितीत मनुस्मृतीचे वास्तव स्वरूप पारदर्शीपणे समोर आणले जाणे अगत्याचे आहे.
मनुस्मृतीनुसार चातुर्वर्ण्यव्यवस्था ईश्वरनिमित आणि जन्माधारित आहे. व्यवसाय, न्यायदान, रोटीव्यवहार, विवाह, कौटुंबिक, सामाजिक व धार्मिक व्यवहार अशा सर्व क्षेत्रांत वर्ण-जातींमधील अन्याय्य विषमतेचा तसेच स्त्रीपुरुष विषमतेचा पुरस्कार करणारी ही संहिता आहे. मनुस्मृतीचे हे स्वरूप तपशीलवार व मूळ पुराव्यांसह पुढे आणण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक.
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात या पुस्तकाचे समाजविघातक स्वरूप प्रकर्षाने पुढे आणले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. समाजाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मनुस्मृतीचे जाहीरपणे दहनही केले. आंबेडकरांच्या या प्रतीकामक कृतीमागील भूमिका मराठी वाचकांसमोर आणणे हादेखील या पुस्तकामागील एक उद्देश आहे.
कॉग्रेड शरद पाटील यांची विवेचक प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.
(out of stock)
MRP ₹200 ₹170 (30₹ Discount)