
(Ambedkari Chalval Ani Socialist Comunist)
लेखक : नामदेव ढसाळ
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
दलित लढ्याचा ज्यांनी पाया घातला ते दलितांचे दिग्विजयी नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना समाजवादाचे, कम्युनिझमचे वावडे नव्हते हे आज आम्ही ठणकावून सांगू शकतो. परंतु आंबेडकरी चळवळीला प्रतिगामी समजून त्याचा विकृत अर्थ लावणाऱ्या डाव्यांबद्दल आज आमच्या मनात घृणा आहे. माझ्या व दलित पँथरपुरते बोलायचे झाले तर आज निश्चित बोलावे, असे मला वाटते. जेव्हा मी प्रजासमाजवादी पक्षात होतो, तेव्हा त्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आम्हास कधीच डोळस होऊ दिले नाही. राष्ट्रसेवा दलाचे कबड्डीचे खेळ आणि शेकोट्या आणि गुलहौशी कवी वसंत बापटांची गाणी आणि पोस्टर लावण्याचे खळीचे डबे रात्रभर घेऊन फिरणे व शहरभर पोस्टर चिकटवणे ह्या पलीकडे आमच्या डोक्यात कसलीच भर पडली नाही.
MRP ₹120 ₹105 (₹15% Discount)