कवितासंग्रह

नामदेवसाठी

(Namdevsathi)

लेखक : मल्लिका अमरशेख

प्रकाशन : मुक्ता प्रकाशन

तू जनित्रे माझी, तू माझी ऊर्जा

माझ्या अंतर्यामीच्या आकाशात उडणारी तू एकमेव चिवचिव चिमणी

मी शोधत राहतो स्वतःलाही तुझ्यासोबत

स्तन आणि जननेंद्रियांच्या दरम्यान

हे नाभीखालचे अमेद्य माझ्यासाठी झाले आहे पवित्र

मीही पवित्र होऊन फाडतो धर्मग्रंथाचे एक एक पान

आणि असे चिमटीत धरून वाऱ्यावर सोडून देतो.

किती सहजगत्या या पशूला तू माणसात आणलेस

मरणाची गोष्ट ऐकवू नकोस मला

मेल्यानंतर जमिनीखालून तुला माझ्याकडे यायची गरज नाही

मीचं शोधत आलो आहे तुझ्या अस्तित्वाची दरवळ जिवंत असताना

बायको, या सोंगाढोंगाच्या दुनियेत मी माझ्याजवळ

असो नसो, तू माझ्याजवळ आहेस

आणि मी एकुलता तुझा


(out of stock)

MRP ₹100 ₹85 (15₹ Discount)