
(Mahatma Jotirav Phule)
लेखक : उमेश बगाडे
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
महात्मा जोतीराव फुले यांचे व्यक्तित्व आधुनिकतेने भारलेल्या एका काळाचे जसे दर्शन घडवते, तसे काळाला घडवणाऱ्या एका व्यक्तीच्या असीम ध्येयनिष्ठेचे व कार्यनिष्ठेचेही दर्शन घडवते. विचार व कृतीची अभिन्नता आणि भावना व विवेकनिष्ठेची एकरूपता जेवढी जोतीरावांच्या व्यक्तित्व व चरित्रामध्ये आढळते. तेवढी अन्यत्र आढळून येत नाही. आपल्या कर्तृत्वाने आपापला काळ अनेकांनी गाजवला; मात्र जोतीरावांच्या विचारसरणीने व कार्यकर्तृत्वाने जातिविद्रोहाचे व मानवमुक्तीच्या लढ्याचे युग घडवले आहे. त्यामुळेच मृत्यूनंतर शंभर वर्षे लोटूनही जोतीरावांचे व्यक्तित्व, विचार व चरित्र सामाजिक प्रेरणेचा अक्षय्य स्रोत होऊन अखंडपणे कार्य करत राहिले आहे.
MRP ₹240 ₹215 (25₹ Discount)