
(Jailbirds)
लेखक : भाऊ पाध्ये
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
जेलबईस ही भाऊ पाध्ये यांची शेवटची कादंबरी. दीर्घ कारावास भोगून परतेले तीन कैदी ! तुरुंगातल्या अनुभवांमुळे बदलून गेलेली त्यांची जीवनदृष्टी. अन्याय्य भूतकाळाच्या सावलीतून मुक्त होण्याची धडपड आणि वर्तमानाला सामोरे जाताना निर्माण झालेले नैतिक पेच हे कादंबरीतले ठळक सूत्र. वेगवान घटनाप्रधान रहस्यकथेचा रूपबंध अनुसरत असतानाही वास्तवाचे आणि सामाजिक चलनवलनाचे नेमके आकलन व्यक्त करणाऱ्या पात्रांचा समूह कादंबरीतून उभा राहतो. मुंबई महानगरातल्या विविधस्तरीय अवकाशांना तिथल्या संभाषितवैविध्यासह कादंबरी पकडते. इथे एकीकडे संघटित गुन्हेगारी, फसवणूक आहे तर दुसरीकडे परस्परांवर विश्वास टाकणारे मैत्रीचे व सहकार्याचे मानवी जगही आहे. कृतक सामाजिकतेची किंवा साचेबद्ध रंजकतेची टोके टाळून कादंबरीच्या अभिजात उत्कंठावर्धक वाचनीयतेचा अनुभव जेलबर्ड्स देते.
- उदय रोटे
MRP ₹300 ₹270 (10% Discount)