
(Durgu Ajichya Goshti)
लेखक : दुर्गा भागवत
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
'गोष्ट सांगेन' असं कुणी म्हटलं की, आपण सगळेच सरसावून बसतो, कारण गोष्टी ऐकायला, वाचायला आणि सांगायलाही आपणा सर्वांनाच आवडतात. त्यातही आजीची गोष्ट असली तर मग आणखीच मजा येते. हो ना? तुम्हाला आवडतील अशा गोष्टींचा खजिना आम्ही तुमच्यासाठी आणलाय. या गोष्टी सांगितल्या आहेत दुर्गुआजीनं म्हणजे दुर्गाबाई भागवत यांनी!
या खजिन्यात गंमतीच्या गोष्टी आहेत. कची कोल्ह्याची, सशाची गोष्ट आहे, तर कधी बहीणभावांच्या भांडणाची, प्रेमाची गोष्ट आहे. तुमच्यासारखी मुलं प्रयत्नपूर्वक आपल्याला हवं ते मिळवू शकतात, त्यासाठी खूप धडपड कशी करतात याची गोष्ट आहे. कधी तुमच्यासारख्या मुलांना त्रास देणाऱ्या, दुष्ट माणसांना धडा कसा शिकवला जातो हेही तुम्ही या गोष्टींमध्ये वाचू शकता. आपला जवळचा मित्र दूर गेल्यावर कशी रुखरुख लागते, कबुतरासारखे पक्षी आपले कसे सोबती असतात तेही यात सांगितलंय.
- प्रस्तावनेतून
MRP ₹275 ₹245 (30₹ Discount)