कथासंग्रह

आलोक

(Alok)

लेखक : आसाराम लोमटे

प्रकाशन : शब्द

....तुम्हांला ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव आहे आणि त्याला कचात्म रंगरूप देऊन तमाम तपशीलासह वाचकासमोर उभे करण्याची निवेदनशैलीही लाभली आहे. गतकाळाच गौरवीकरण करत गळा काढण्यात तुमची कथा रमत नाही आणि 'आज आणि आत्ता'ला साक्षात भिडते ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. 'ग्रामीण कथा' लिहिण्याच्या नावाखालो किस्सेबाज किंवा वखवखलेलो कथानकंच मोठ्या प्रमाणात देण्याची परपरा तुमच्या कथेन स्पष्टपणे नाकारली आहे. कारण ज्या जीवनाविषयी तुम्ही लिहिता त्याबद्दल तुम्हाला जिवत आस्था आहे....

- भा.ल.भोळे (आसाराम लोमटे याना पाठविलेल्या पत्रातून)


'आलोक' या कथासंग्रहातले नव्या वास्तवाचे चित्रण, निसर्ग-पाऊसपाण्याचे वर्णन, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले वेडेवाकडे, भ्रष्ट, बेमुर्वत राजकारण आणि ग्रामीण बोली-शैलोचा नवा, अचूक साज याचे अभिनव रसायन वाचकाला गुंग करून टाकते... लोमटे याची शैली अचूक, अभिनव ग्रामीण कथाकार ठोकळ, यादव आणि व्यंकटेश माडगूळकर, चारुता सागर यांना पार मागे टाकणारी... अस्सल प्रादेशिक आणि बोलीभाषेचे रगरूप घेऊन मातीतली मुळं शोधणारी, उघड करणारी... नव्या वास्तवाचे, नव्या शैलीतील नवी बोलीभाषा वापरून मनाचे ठाव घेणारे वित्रण आसारामसारखे तरुण लेखक करीत आहेत, त्याचा हेवा वाटतो आणि त्याना सलामही करावासा वाटतो.

- म. द. हातकणंगलेकर (महाराष्ट्र टाइम्स, दि. ५ डिसेंबर २०१०)

MRP ₹300 ₹270 (10% Discount)