
(Bodhchinhacha Vad : Pratikanche Sanskrutik Rajkaran)
लेखक : दिलीप चव्हाण
प्रकाशन : मुक्ता प्रकाशन
औद्योगिक समाजास उपयुक्त असलेल्या क्रयवस्तूंचे उत्पादन, वितरण आणि उपभोग यांसाठी आवश्यक अशा ज्ञान, संशोधन आणि कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणे आधुनिक विद्यापीठांकडून अपेक्षित असते. त्याचबरोबर, कल्याणकारी समाजातील विद्यापीठांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचे संवर्धन करणेदेखील अपेक्षित असते. भारतातील सार्वजनिक विद्यापीठे ही अपेक्षा पूर्ण करतात काय, या प्रश्नाची चर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हबदलाच्या निमित्ताने व्हावी.
हे विद्यापीठ महाराष्ट्रातील अभिजनांच्या सांस्कृतिक प्रभुत्त्वाचे एक प्रमुख क्षेत्र राहिले. बोधचिन्हातील प्रतीकांत पारंपरिक अभिजनांच्या अस्मितेचे राजकारण प्रतिबिंबित होते. हे सांस्कृतिक राजकारण बोधचिन्हातून दृश्यमान होताना अभिजनांचा केवळ 'स्व' सुखावत नसते, तर॒ अभिजनांची प्रतीके अभिजनेतरांना स्वीकारायलादेखील ते उद्युक्त करीत असते. अशा राजकारणाद्वारे सामान्यजनांचे अंकितीकरण साधले जाते. अभिजनवर्ग अशा चिन्हात्मक राजकारणाद्वारे स्वत:च्या भौतिक हितसंबंधसंवर्धनाची तजवीज करीत असतो. चिन्हबदलाची मागणी करताना चिन्हात्मक राजकारणामागे दडलेल्या या भौतिक हितसंबंधांचे भान असायला हवे.
(out of stock)
MRP ₹200 ₹170 (30₹ Discount)