
(Bhaychakitachya Savalya)
लेखक : मल्लिका अमरशेख
प्रकाशन : मुक्ता प्रकाशन
कित्ती गर्दी झालीय इथे
संपवून टाका एकमेकांना
९.५५ ची बडा फास्ट
एके सत्तेचाळीसचं प्लेन
अंटा्क्टिकावर झेंडा लावायला झालेली गर्दी
ओझोन पण कंटाळून सोडून चालाय
भाषेचं वासरू उंडारत नाही कुठल्याच कुरणात
जनावरं माणसातली मोकळी सुटलीत
पासपोर्ट हवाय रोहित पक्ष्यांना
माशांना अडवलं जातंय
पाण्यातही आखल्या जातायत हद्दी
बाईला कळत नाही पुरूष
पुरुषाला कळत नाही कुठलीच स्त्री
केवढा गहजब
केवढा गोंधळ माजवलाय माणसांनी डेव्हलप होऊन
माणसं जन्माला घालतात जातबित
देवधर्म दंगल बिंगल युद्धबिद्ध
गर्दीच गर्दी...
(out of stock)
MRP ₹200 ₹170 (30₹ Discount)