कवितासंग्रह , अनुवादित

यमन

(Yaman)

लेखक : माधव बोरकर

प्रकाशन : साहित्य अकादमी

भाषिक नादमयेतसह केलेलं निसर्गचित्रण हे कोंकणी कवितेचं एक वैशिष्ट्य यमन कवितासंग्रहातून वाचकांसमोर अधिक ठळकपणे येतं. संगीतातील यमन राग रात्रीच्या प्रथम प्रहरास किंवा दिवेलागणी समयी आळवला जातो, त्याचप्रमाणे कवी माधव बोरकर यांच्या या कवितासंग्रहातून देखील दिवेलागणी समयीची उत्कट व भावविभोर अवस्था टिपलेली दिसते. त्यात निसर्गातील अनेक छटा शब्दबद्ध झालेल्या असून शाश्वत नात्यांचा शोधही तटस्थपणाने घेतलेला आढळतो. त्यामुळेच बोरकरांच्या कवितेतील प्रेमभाव शारीत पातळीवरील न उरता त्यास अनंताची लय गवसलेली दिसते आणि त्याचाच प्रत्यय या अनुवादातून देखील येतो. 2001 च्या साहित्य अकादेमी पुरस्काराने सन्मानित यमन कवितासंग्रहाचा प्रस्तुत मराठी अनुवाद सर्जनाच्या पातळीवर कोंकणीशी तादात्म्य पावल्याने निश्चितच एक स्वतंत्र अनुभूती मराठी काव्यरसिकांना देईल अशी खात्री वाटते.

(out of stock)

MRP ₹175 ₹140 (35₹ Discount)