(Vangmayetihasache Punarlekhan)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
इतिहास लेखन ही सतत चालणारी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे स्थिती, गती, काल व अवकाश यांच्या उजेडात दर क्षणी इतिहासाकडे नवनव्या दृष्टिकोणातून बघितले जाते आणि त्याच्या लेखनक्रमाला बदलणे भाग पडते समाज गतिमान असतो, नव्या जुन्याचा मेळ घालता घालता नवी पद्धतिशास्त्रे जन्मास येत असतात आणि यातूनच घटनांचे सुसंघटन करताना नवनवे विचारव्यूह निर्माण होऊन त्या विचारव्यूहांच्या दृष्टिकोणातून नव्या इतिहास लेखनाची पद्धती आकाराला येत असते. त्यामुळे इतिहास लेखनात सावधगिरी व शिस्त जशी महत्त्वाची तसेच अष्टावधानी लेखन पद्धतीचा वापरही तितकाच गरजेचा इतिहास लेखन हे स्वतःच आव्हाने निर्माण करत असते आणि त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठीच्या आयुधांची जमवाजमव करण्यास भाग पाडत असते.
अलीकडच्या काळात समृद्ध ज्ञान परंपरांच्या सहाय्याने वाङ्मय इतिहास लेखनाच्या नवनव्या पद्धती जन्म पावत आहेत. त्यांच्या सहभागाने व साहचर्याने मराठी वाङ्मय इतिहास लेखन नव्या दृष्टिकोणातून अवतरत आहे. ही कालदृष्ट्या आश्वासक बाब आहे. प्रस्तुत ग्रंथात वाङ्मय लेखन पद्धती बाबत सखोल विचार करण्याचा प्रयत्न जसा झालेला आहे तसाच वाङ्मय इतिहासाचा पुनर्शोध व पुनर्लेखनाच्या दिशा सूचित करणाऱ्या विविध निबंधांचा समावेश केलेला आहे. हा प्रयत्न उद्याच्या वाङ्मय लेखनात शिस्त व निर्मळ दृष्टिकोण निर्माण होण्यात उपयुक्त ठरणार आहे.
या ग्रंथाच्या संपादिका शोभा नाईक ह्या कवयित्री, समीक्षक, अनुवादक म्हणून जशा परिचित आहेत तशाच कन्नड-मराठी संस्कृती शोध घेणाऱ्या अभ्यासक म्हणूनही सुपरिचित आहेत. त्या बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर रणधीर शिंदे हे मराठीतील कवितेचे आश् आश्वासक अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी दिलीप चित्रे यांच्या कवितेवर मुलभूत लेखन केले असून ते शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
(out of stock)
MRP ₹360 ₹290 (70₹ Discount)