संतसाहित्य , अभंग

तुकाराम गाथा : निवडक अभंग

(Tukaram Gatha : Nivadak Abhang)

लेखक : -

प्रकाशन : साहित्य अकादमी

तुकाराम (१६०८-१६५०) हा भक्तिसंप्रदायाचा मराठीतील अत्यच्च मानबिंदु समजला जातो. जन्मभर शूद्र म्हणून अवहेलना आणि छळ सहन करणाऱ्या ह्या संतकवीने केवळ आपल्या भाषिक आविष्काराच्या जोरावर सद्‌गुरू म्हणून समाजाच्या सर्व थरांत सर्वकाळ अढळ स्थान मिळवले. ही अभूतपूर्व प्रक्रिया त्याच्या अभंगांमधून प्रत्यक्ष घडताना आपल्याला अनुभवता येते. वेळोवेळी लिहून ठेवलेले त्याचे अभंग आत्मोन्नतीचा अभिजात आलेख दर्शवतात. आविष्कार स्वातंत्र्याचा इतिहास घडवणाऱ्या असामान्य प्रतिभावंतांमध्ये तुकाराम अग्रगण्य राहील. मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक जीवनात त्याचा प्रभाव अद्वितीय आहे. मानवी जाणिवेने काळाचा छेद करून विश्वचैतन्याप्रत पोहोचण्याचा अद्भुत चिद्विलास तुकारामाच्या मुक्तिपर अभंगातून व्यक्त होतो. देवाचेही अस्तित्व ओलांडून कालातीत, उत्पत्तीलयाच्या वरचे अस्तित्व प्राप्त करून देणारी चौथी मिती तुकारामाला प्राप्त झालेली दिसते. सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार, कवी आणि समीक्षक भालचंद्र नेमाडे ह्यांनी साहित्य अकादेमीसाठी प्रस्तुत अभंगांचे संपादन केले असून ह्यात तुकारामाच्या सर्वोत्कृष्ट 500 अभंगांची निवड केली आहे. विरक्ती, भक्ती, नैतिकता, कवित्व, संतत्व आणि मुक्ती-अशा सहा पैलूंमधून तुकारामाचे व्यक्तित्व दाखवणारे हे संपादन सर्व कविताप्रेमी लोकांस कायम जवळ बाळगावेसे वाटेल.

(out of stock)

MRP ₹250 ₹200 (50₹ Discount)