(Swatantryottar Marathi Kavita : 1945 - 1960)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
1945 ते 1960 या कालाखंडातील कवितेचे एकूण चित्र पाहिले तर ते विविधतापूर्ण आहे. कवितेतील आशय, भाषा आणि रूप अशा सर्वच पातळ्यांवर ही विविधता दृष्टीस पडते. व्यक्तिगत आणि सामुहिक मानवी अस्तित्वाच्या अनेकविध अवस्थांचे चित्रण या कवितेत झाले आहे. आत्यंतिक व्यक्तिकेंद्री आशयापासून ते समूहकेंद्री आशयापर्यंतची एक विस्तृत कक्षा येथे दृष्टीस पडते. ही विविधता केवळ आधीच्या काळाच्या तुलनेने नव्हे, तर एकूण मराठी काव्येतिहासातही लक्षणीय म्हणावी अशा प्रकारची आहे. या विविधतेचा स्रोत मूलतः नवी जीवनदृष्टी व काव्यदृष्टी यांमध्ये आहे.
या कालखंडातील मराठी कवितेत स्थूलमानाने व्यक्तिलक्ष्मी, समूहलक्ष्यी व सौंदर्यलक्ष्यी असे तीन प्रवाह दिसून येतात. या प्रत्येक प्रवाहात मिन्न प्रकृतिधर्माचे कवी पहावयास मिळतात. आधुनिकवादी आशयसूत्रे आणि काव्यभाषा, काव्यरूप यांबाबत प्रयोगशील दृष्टी व्यक्त करून मराठीमध्ये नवकवितेचा प्रवाह निर्माण करणारे बा. सी. मढेकर आपल्या अनन्यसाधारण काव्यशैलीने स्वतंत्र काव्यविश्व उभारणारे पु. शि. रेगे आणि निश्चित परिवर्तनवादी दृष्टी घेऊन भविष्यकालीन समाजाचे चित्र रेखाटणारे शरश्चंद्र मुक्तिबोध, या तीन भिन्न प्रकृतिमर्माच्या कवींच्या कवितांतून या काळातील कवितेचा पट आकाराला आला आहे
(out of stock)
MRP ₹250 ₹200 (50₹ Discount)