(Swarlay)
लेखक : सामल सदाशिव
प्रकाशन : साहित्य अकादमी
सामल सदाशिव (1928) हे कागज नगरच्या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून 1948 साली रूजू झाले. 1983 साली भद्रायलम् येथील शासकीय ज्युनिअर आर्टस् कॉलेजचे ते प्राचार्य झाले. समाजात आपली ओळख 'शिक्षक' या नात्याने व्हावी, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. कवी, लेखक म्हणून आपली कीर्ती व्हावी, असा त्यांचा मानस नव्हता. चित्रकलेत निमग्न राहाणे, संगीतात बुडून जाणे अशा व्यापात असताना कविता, स्फुटलेखन या बाबी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या वाटायच्या. विद्यार्थ्यांना मनापासून शिकवत राहावे हीच गोष्ट त्यांच्या तनमनात रूजलेली होती.
1950 ते 1980 पर्यंत त्यांनी विपुल लेखन केले. सुरुवातीला दोन खंडकाव्ये व एका कादंबरीचे लेखन केले. नंतर 1966 ते 1983 पर्यंत त्यांनी आंध्रप्रदेशच्या उर्दू साहित्य अकादमीचे सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले. यावेळी त्यांनी बरीच पुस्तके लिहिली. साहित्य अकादेमीसाठी केशवसुत (मराठी कवीचे जीवन चरित्र) या शीर्षकाचे, आंध्र साहित्य अकादमीसाठी अमजद रूबाईयाँचा तेलुगु अनुवाद, मौलाना रूमी यांच्या फार्सी काव्याचा तेलुगु अनुवाद, मिर्झा गालिब (जीवन काव्ये) याच बरोबर उर्दू कवींच्या साहित्याचा परामर्श घेत त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सियासत सारख्या अनेक उर्दू वर्तमानपत्रातून त्यांनी सुमारे 300 लेख लिहीले. सुजाता, कृष्णा, भारती साहिती, आंध्र ज्योती, आंध्रप्रभा, ज्योती, वार्ता, आंध्रभूमी आदी ख्यातकीर्त वृत्तपत्रांतून त्यांनी सुमारे 400 हून अधिक लेख लिहिले. पुढे त्यांनी लिहिलेल्या या सर्व लेखांची काही पुस्तके निधली. वेळोवेळी या पुस्तकांना शासकीय पुरस्कारही मिळत गेले. त्यांचा यथोचित गौरव झाला. 1988 साली हैदराबाद येथील पोट्टी श्रीरामुलु तेलुगु विद्यापीठाच्या वतीने त्यांना डी. लिट. ही मानद पदवीही प्राप्त झाली.
(out of stock)
MRP ₹140 ₹105 (35₹ Discount)