(Striyanche Marathitil Nibandhlekhan)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
आजवर लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळुणकर, लोकमान्य टिळक अथवा आगरकर ह्यांचे निबंधलेखन आपल्या परिचयाचे होते. परंतु स्त्रियांच्या निबंधलेखनाच्या ह्या संकलनातून, महाराष्ट्रातील स्त्रियांनी अगदी १८६८ पासून ते २०१२ पर्यंत केलेले निबंधलेखन समाविष्ट आहे. निबंधलेखनासारखा वैचारिक साहित्य प्रकार स्त्रिया हाताळत होत्या आणि ह्या लेखनाचा दर्जा, विविधता आणि थेटपणा पाहता, वेळोवेळी अशा लेखनातून प्रस्थापित व्यवस्थेला परखड भाषेत प्रश्न विचारले गेले होते हे दिसते.
येथे स्त्रियांच्या लेखनाची फक्त नवी स्मारके निर्माण करण्याचा प्रयत्न नाही तर, स्त्रियांच्या लेखनातून 'स्व' आणि 'कर्तेपणा' ह्या भूमिकेतून झगडा देऊन कोणते व्यवहार केले जातात, हे दाखविण्याचा प्रयत्न आहे. म्हणजेच स्त्रियांच्या निबंधलेखनातून एक सामाजिक दस्तऐवज निर्माण व्हावा असा हा प्रयत्न आहे. स्त्रिया आपल्या निबंधलेखनातून आपले संघर्ष कसे मांडतात, त्यांचे हे संघर्ष कसे घडतात आणि त्या संघर्षातून त्यांचे जग कसे आकार घेते हे ह्या निबंधातून पाहिले जावे. म्हणजेच ह्या लेखनातून स्त्रियांनी प्रतिकाराच्या कोणत्या रीती निर्माण केल्या, स्त्रियांना नियंत्रित करणारे कोणते प्रकल्प त्यांनी टाळले आणि त्याविषयी त्यांनी कोणते प्रश्न विचारले हे पाहण्याचा ह्या संकलनात प्रयत्न केला आहे.
इतिहास निर्माण करणाऱ्या स्त्रिया म्हणून फक्त अभिजन वर्गातील स्त्रियांकडे पाहिले जाऊ नये आणि दलित कष्टकरी समुहातील स्त्रियांचे योगदान लक्षात घेऊन, महाराष्ट्रातील स्त्रिया निबंधलेखनातून भिन्न मार्गांनी जो विचार मांडत होत्या तो विचार येथे समजावून घेणे महत्त्वाचे वाटते.
(out of stock)
MRP ₹270 ₹215 (55₹ Discount)