कादंबरी , अनुवादित

स्मारक शिळा

(Smarak Shila)

लेखक : पुनत्तील कुन्हअब्दुल्ला

प्रकाशन : साहित्य अकादमी

स्मारक शिळा या कादंबरीची कथा एका प्राचीन मशिदीच्या व तिच्या आजूबाजूच्या परिसरात विणलेली आहे. लेखक केरळमधल्या एका संपूर्ण खेडयाचा एक हिस्सा वाचकापुढे उभा करतो. तेथील दफनभूमी हा त्याचा अविभाज्य भाग आहे. त्या जीवांना लेखक पुनरुञ्जिवित करतो. पुकोया तंगल हा श्रीमंत अरक्कल कुटुंबातला एक जमिनदार आहे. एक अभावानं दिसणार व्यक्तिमत्व, एकीकडे परोपकारी, दानशूर मान्यवर तर दुसरीकडे विषयसुखेच्छु, विषयांध. त्याच्या भोवती समाजातील भरपूर पात्रं आहेत. तीही विविध प्रवृत्तींची. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा. ते हेकेखोर, भांडखोर, लोभी, स्वार्थ निरागस, मुकाट बळी जाणारे आहेत. लेखक अतिशय अलिप्तपणे ह्या स्त्री-पुरुषांना वाचकांसमोर उभा करतोय. ही कादंबरी केरळ साहित्य अकादमी आणि साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त आहे.

प्रख्यात कादंबरीकार पुनत्तील कुन्हअब्दुल्ला हे वैद्यकीय पदवीधर होते. ते फिजिशियन म्हणून कार्यरत होते. या कादंबरीच्या प्रकाशनापूर्वीही लेखन क्षेत्रात त्यांचा लौकिक होता. विषयांचा ताजेपणा आणि सशक्त कथालेखनाबद्दल ते वाचकाला परिचित होते. कादंबरी, कथासंग्रह, स्मरणचित्रे, आत्मचरित्र, प्रवासवर्णन असे विविध वाड्मयप्रकार त्यांनी हाताळलेले असून त्यांचा काही साहित्यकृतींची भाषांतरेही झालेली आहेत.

स्मारक शिळा हा मराठी अनुवाद करणाऱ्या छाया महाजन ह्या स्वतः मराठीतल्या प्रथितयश लेखिका आहेत. कथा आणि कादंबरीसारख्या वाड़मयप्रकारांत समर्थपणे लेखन करताना त्या आस्थेने अनुवादही करीत आल्या आहेत. ह्याआधी साहित्य अकादेमीने रवीन्द्रनाथांची चार नाटके हे त्यांचे अनुवादित पुस्तक प्रकाशित केलेले आहे.

(out of stock)

MRP ₹250 ₹200 (50₹ Discount)