(Shabdancha Akash)
लेखक : सीताकांत महापात्र
प्रकाशन : साहित्य अकादमी
सीताकांत महापात्र यांचा जन्म १७ सप्टेंबर, १९३७ रोजी ओरिसा मध्ये झाला. उत्कल, अलाहाबाद आणि केंब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण झाले. अधिकतर त्यांचे लेखन ओडिया भाषेत असून, काही पुस्तके इंग्रजीतही प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या साहित्याची भाषांतरे भारतीय व विदेशी भाषेत झाली आहेत. उडिया भाषेत त्यांनी 21 कविता संग्रह, साहित्य आणि संस्कृती विषयक ९ निबंध संग्रह आणि ४ प्रवास वर्णन. सोबतच साहित्य समीक्षा आणि भारतीय कलेवर ही लेखन केले आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ओरिसा साहित्य अकादमी पुरस्कार, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार, सरला पुरस्कार, ओरिसा राज्य संस्कृती पुरस्कार आणि विशुवा जागतिक पुरस्काराने गौरविले आहे. 1961 पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होते. ओरिसा सरकार व भारत सरकार च्या विविध पदावर कार्य केले. सोबतच युनेस्को च्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. युनेस्कोच्या सांस्कृतिक घडामोडींच्या आंतरराष्ट्रीय समितीचे ते अध्यक्ष राहिले आहेत. ते नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, नवी दिल्ली चे अध्यक्ष होते.
डॉ. महापात्र आपल्या कवितांमध्ये शहरी जीवनापासून ते ग्रामीण जीवनाचे तपशील, नैसर्गिक घटना, धार्मिक विधी, हिंदू पौराणिक कथा आणि ऐतिहासिक घटनांशी संबंधित सांस्कृतिक संकेतांचा यशस्वी व कलात्मक वापर केला आहे त्यांच्या शब्दांचं आकाश ('शब्दरा आकाश'मूळ उडिया काव्यसंग्रह) या कविता संग्रहातील भारतीय व विदेशी मिथके व्यक्ती, काळ. मृत्यू आणि त्यांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या वास्तववादी जगण्याशी थेट भेडतात. या कविता सामान्य माणसाला आपल्या वाटतात. त्यांच्या कवितेत दाखविलेल्या ऐहिक मर्यादांच्या पलीकडे जाण्याच्या शोधात आणि प्रयत्नांमध्ये आपल्याला एक सशक्त आणि उत्साही अभिव्यक्ती आढळते. त्यांच्या कविता उत्कृष्ट अध्यात्मिक तत्त्वे आणि सत्ये सोप्या भाषेत मांडतात. कवितेची ही वैशिष्ट्ये त्यांना आधुनिक भारतीय कविंमध्ये एक वेगळे स्थान मिळवून देतात.
(out of stock)
MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)