कथासंग्रह , अनुवादित

सात शिखरे

(Sat Shikhare)

लेखक : अख्तर मुहिउद्दीन

प्रकाशन : साहित्य अकादमी

सुविख्यात काश्मिरी लेखक अख्तर मुहिउद्दीन यांच्या साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त सात संगर या कथासंग्रहाच्या मराठी अनुवादाची ही दुसरी आवृत्ती. सात शिखरे या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत आणि या सगळ्याच कथांमधून आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे या ना त्या प्रकारे त्रस्त असलेली माणसं आपल्याला भेटतात. पण कितीही आणि कशीही त्रस्त झालेली असली तरी ही माणसं आयुष्यातल्या अडीअडचणींतून काही ना काही मार्ग काढण्याची आपली अंगभूत ऊर्जा जिवंत ठेवून आहेत आणि म्हणूनच ती असाधारण ठरतात. ही माणसं आणि त्यांच्या आयुष्यातले सामान्यच म्हणावेत असे प्रसंग चित्रित करताना अख्तर मुहिउद्दीन यांनी विनोद, उपरोध यांचा कौशल्यपूर्ण वापर करून अतिसामान्यातून काही असामान्य शोधत राहणारे आपले अप्रतिम कथनतंत्र सिद्ध केले आहे.

(out of stock)

MRP ₹125 ₹100 (25₹ Discount)