(Sanshayatma)
लेखक : ज्ञानेंद्रपति
प्रकाशन : साहित्य अकादमी
ज्ञानेंद्रपति यांच्या कवितेने जनमानसाचे सिंचन करणारा, त्याबद्दल आस्था बाळगणारा, आणि 'जनशत्रू' शक्तींसोबत लढा देणारा कवितेचा प्रवाह आजच्या सुखवणाऱ्या भुलवणाऱ्या काळातही आटलेला नाही याची ग्वाही कविताप्रेमींना दिलेली आहे. कवीच्या या संग्रहाआधीच्या गंगातट या कवितासंग्रहात स्थानिकतेच्या जलदर्पणात आजच्या वैश्विक काळाचे प्रतिबिंब होते, तर संशयात्माचा परिसर विश्वविस्तृत आहे, ज्याच्या केंद्रस्थानी करूणेनं ओथंबलेलं आणि सात्विक क्रोधानं संतप्त झालेलं एक भारतीय अंतःकरण आहे.
ज्ञानेंद्रपति यांची काव्यभाषा केवळ तिच्यात देशज अपांक्तेय नाही वा तत्सम अस्पर्शित नाही म्हणून समकालीन चलनापेक्षा वेगळी आहे असे नसून तिला जगण्याच्या धगीतून उब मिळत जाते, त्यातले शब्द धुळीनं आणि वनफूलांच्या परागकणांनी माखलेले आहेत म्हणून वेगळी आहे, कविता भाषेनं रचली जाते असेच फक्त नसून ती भाषेलादेखील रचत जाते आणि हे काम जगण्याच्या ऐरणीवर होत असतं हे तथ्यदेखील आपल्याला या कविता वचताना जाणवतं.
गीतेतील ओळ आहे - संशयात्मा विनश्यति; संशयात्मातील कविता वाचून निःसंशय हे म्हणू शकतो - संशयात्मा विपश्यति.
संशयात्माचे भाषांतरकार प्रफुल्ल शिलेदार हे स्वतः मराठीतले महत्त्वाचे कवी आहेत. त्यांचे स्वगत आणि जगण्याच्या पसाऱ्यात हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत, शिवाय पूल नसलेली नदी आणि जास्तीचे नाही ही दोन भाषांतरीत पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत.
(out of stock)
MRP ₹175 ₹140 (35₹ Discount)