(Sane Guruji Punarmulyankan)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी हे स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी व भारतीय जनमानसाशी काया वाचा मने करून एकजीव झालेले विलक्षण व्यक्तिमत्व होते.
लोकसाहित्यापासून विश्वसाहित्यापर्यंतचे विशाल प्रभाव पचवणारे, अनेक वाङ्मयप्रकार सर्जनशीलतेने वापरणारे, अनेक धर्मांच्या व संस्कृतींच्या अभ्यासातून नवी जीवनदृष्टी विकसित करणारे, सर्व थरातल्या शोषितांचा कळवळा असलेले, परंपरेचे उभे व आडवे भान प्रत्येक कृतीत सतत बाळगणारे, भारतीय संस्कृतीची नव्याने व्याख्या करणारे, भारतीय आध्यात्म्याचे स्त्रोत असलेल्या जीवनमूल्यांची नव्याने मांडणी करणारे असे एखाद्या महाकवीस साजेसे व्यक्तिमत्त्व असूनही गेल्या पन्नास वर्षातल्या मराठी समीक्षेला त्यांचे निश्चित स्थान ठरवता आलेले नाही.
साने गुरुजींच्या जन्मशताब्दि वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्याचे सर्वांगीण मूल्यमापन साहित्य अकादेमीने एका राष्ट्रीय चर्चासत्रात केले. त्या चर्चासत्रातील महत्त्वाच्या निबंधांचे हे संकलन असून ह्यातून आपल्या पिढीच्या सोळा विचारवंतांनी साने गुरुजींची वाङ्मयीन व सांस्कृतिक प्रस्तुतता वस्तुनिष्ठ पद्धतींनी चर्चिली आहे.
(out of stock)
MRP ₹130 ₹105 (25₹ Discount)