(Ravindranathanchya 101 Kavita)
लेखक : रवींद्रनाथ ठाकुर
प्रकाशन : साहित्य अकादमी
रवींद्रनाथ मुख्यत्वे गीतकार आहेतच, परंतु त्यांचे सृष्टीप्रेम व जीवनातील वैविध्य यांबरोबरच असलेल्या त्यांच्या अंतरंगपरतेनेही त्यांच्या बऱ्याचशा कवितांत एक सुसमृद्ध नाट्यगुण आणलेला दिसतो. त्यांचे मानवाबद्दलचे प्रेम अजाणता व अपरिहार्यपणे भगवंताच्या प्रेमाचे रूप धारण करते आणि त्यांच्या कल्पनेत जीवनाभिरुचीचा जो विकास झाला आहे त्यांत निसर्ग व मानव एकरूप होऊन गेले आहेत. मनुष्यजीवन आणि ईश्वर यांच्या अभिन्नत्वावरही ते ठाम आहेत.
प्राचीन भारतीय साहित्याचा वारसा, मोगल दरबारातील विशिष्ट थाट, बंगालच्या सर्वसामान्य वनांतील सहजसत्य आणि आधुनिक युरोपातील उद्दाम शक्ति व बौध्दिक बलवत्ता यांचे संमिश्रण होऊन रवींद्रनाथांची कविता निर्माण झाली आहे. ते सर्व युगांचे व सर्व संस्कृतींचे उत्तराधिकारी आहेत. ह्या भिन्न भिन्न सूत्रांच्या व प्रसंगांच्या संयोगामुळे त्यांच्या कवितेला कोमलता, सार्वभौमिकता आणि संपूर्ण हृदयंगमता यांची देणगी मिळाली आहे.
(out of stock)
MRP ₹225 ₹180 (45₹ Discount)