(Ravindranath Tagoreanchi Char Natake)
लेखक : रवींद्रनाथ ठाकुर
प्रकाशन : साहित्य अकादमी
रवींद्रनाथांची ख्याती कवी म्हणून असली तरी त्यांनी लिहिलेली नाटकेही अनेक आहेत. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी पहिले नाटक लिहिले. तेथपासून आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांची नाटक रचना व नाट्यप्रयोग सुरू होते.
त्यांच्या चार नाटिकांचा सुप्रसिद्ध मराठी लेखिका छाया महाजन यांनी केलेला अनुवाद या पुस्तकात समाविष्ट आहे.
रवींद्रनाथ यांची जीवनाविषयीची सकारात्मकता, निसर्गाची ओढ, सौंदर्यग्राहकता आणि मानवता व आध्यात्मिक अनुभूतीच्या संगमातून येणारी एकात्मकता या नाटकांतून दिसते. बंगाली नाटकातून हमखास येणारे उपकथानक आणि स्वगते हा साचेबंदपणा त्यांनी अनेकदा वापरलाही आहे आणि तोडलाही आहे. उलट मालिनी सारख्या नाटकात एक केंद्रीकरण जाणवते. यात जुनाट धर्मपरंपरेला धक्का देताना सामूहिक मानसिकतेचा कहर दाखवताना विशुद्ध मैत्रीचा पैलू सुस्पष्टपणे येतो. चित्रा या काव्यनाट्यामध्ये प्रेम व स्त्रीत्वाच्या तत्त्वावर आत्यंतिक सश्रद्धता आहे. शारदोत्सवाच्या रचनेत नवीन तंत्र विकसित केले आहे. ही नाटिका राज्यकर्त्यांची न्याय्य सामाजिकता दाखवते. रवींद्रनाथांच्याच भाषेत 'मी भावनात्मकतेनं लिहिलंय संघर्षात्मक कृतीसाठी नव्हे' हेही सिद्ध करते. संन्यासी जीवनतत्त्वांची चर्चा आहे. जीवन आणि अलिप्तता यांचा संघर्ष आहे. रवींद्रनाथांच्या आध्यात्मिक जीवनातल्या परिवर्तनाची छाप या नाटिकेवर आहे.
सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक छाया महाजन यांची आजपर्यंत जी सव्वीस पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यामध्ये कादंबरी, चरित्र, कथा, ललित गद्य, बालवाङ्मय आणि भाषांतरांचा समावेश आहे. आपल्या सर्जनशील लेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून अन्य प्रतिष्ठित संस्थांचेही पुरस्कार मिळालेले आहेत. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधून त्यांनी आपले संशोधनपर निबंध नियमित सादर केलेले आहेत.
(out of stock)
MRP ₹100 ₹80 (20₹ Discount)