निबंध , अनुवादित

निबंधमाला खंड १

(Nibandhmala Khand 1)

लेखक : रवींद्रनाथ ठाकुर

प्रकाशन : साहित्य अकादमी

रवींद्रनाथ ठाकुर ह्यांची जगभर कवी म्हणून ख्याती आहे. इतर वाङ्‌मयप्रकारांतले त्यांचे कार्य बंगालबाहेर विशेष प्रसिद्ध नाही. वस्तुतः पद्य व गद्य दोन्हींवरही त्यांचे सारखेच प्रभुत्व होते. एका दृष्टीने आधुनिक बगाली गद्याच्या विकासात त्यांचे कार्य काव्यापेक्षाही अधिक मूल्यवानः कारण भारतीय भाषांतून काव्याची समृद्ध परंपरा जुनीच आहे. फक्त ठाकुरांनी त्याला नवे रूप दिले. पण कादंबरी व नीत्युपदेश वगळल्यास ठाकुरांपूर्वी गद्य विशेष नव्हते. ठाकुरांनी गद्याला एक श्रेष्ठ वाङ्‌मयीन माध्यम म्हणून प्रतिष्ठित केले आणि पूर्वीच्या अलंकारप्रचुर व क्लिष्ट साहित्यशैलीतले आणि सर्वसामान्य लोकांच्या बोलीभाषेतले अंतर कमी केले.

ठाकुरांच्या गद्य लिखाणातील हे संकलन मराठी वाचकांना निबंध, आत्मकथा, वाङ्‌मय-समीक्षा व 'रम्य रचना' हह्या दालनांतून त्यांच्या विपुल कामगिरीची कल्पना देऊ शकेल.

(out of stock)

MRP ₹700 ₹560 (140₹ Discount)