कथासंग्रह , अनुवादित

मोरनामा आणि इतर कथा

(Mornama Ani Itar Katha)

लेखक : इंतजार हुसैन

प्रकाशन : साहित्य अकादमी

ज्येष्ठ लेखक इंतजार हुसैन ह्यांचे केवळ अनुभवविश्वच नव्हे तर अनुभवग्रहणाची संवेदनशीलताच एकदम निराळी आहे, हे प्रस्तुत संग्रहातील एकवीस कथा वाचून आपल्याला प्रकर्षाने जाणवते. इंतजार हुसैन ह्यांनी डोळसपणे जीवन जगताना जे पाहिले, जे साहिले त्यातूनच त्यांच्या साहित्याचे आशयद्रव्य गोळा केले. त्यांच्यातल्या अत्यंत संवेदनशील लेखकाला फाळणीच्या वास्तवाने मुळापासून हादरवले होते. आपल्या अनुभवांशी अभिन्नपणे जोडला गेलेला भोवतालचा सजीव-निर्जीव परिसर सोडून स्थलांतरित झालेल्या हवालदिल `माणसांच्या यातनापूर्ण मनोव्यवस्थेला काही सखोल आणि चिरंतन अर्थ आणि आशय देण्याचा अतिशय कलात्मक प्रयत्न त्यांच्या कथांमधून जाणवतो. हुसैन ह्यांनी आपल्या कथांमधून ज्या सुखदुःखांच्या अनुभवांचा, संघर्षांचा ऊहापोह केला आहे ते त्यामुळे स्थलांतरित झालेल्या निर्वासितांचे किंवा केवळ एखादया उपखंडातील रहिवाशांचेही न राहाता जगभरच्या मानवजातीचेच होतात. समर्थपणे त्या संघर्षांना शब्दबद्ध करण्यातच इंतजार हुसैन ह्यांची लेखक म्हणून थोरवी सामावलेली आहे.

(out of stock)

MRP ₹130 ₹105 (25₹ Discount)