(Maukhik Ani Loksahitya)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
मानवी जीवनातील मौखिक व्यवहार खऱ्या अर्थाने चालते बोलते असतात. भाषेची खरी स्वाभाविकता मौखिक आविष्कारातून अनुभवास येत असते. लीळाचरित्र, गोविंदप्रभुचरित्र यांसारख्या औद्य गद्य ग्रंथांतील मराठी भाषा गंगोत्रीच्या पाण्यासारखी प्रदूषणमुक्त प्रवाही वाटते याचे मुख्य कारण म्हणजे या भाषेचे मौखिक परंपरेशी अतूट नाते आहे.
डोंगरदऱ्यातील जसा खळाळ ओघवता असतो तशीच मौखिक व्यवहारातील भाषाही. हे पाणी कधी उचंबळते, कधी स्फटिकासारखे फेसावते. अर्थवलये मस्त फेसावतात.
सामान्यांच्या वाणीमध्ये प्रत्यक्षीकरणाची ताकद असते आणि ही ताकद स्वाभाविक अशा ध्वन्यनुसारी शब्दांनी वाढविलेली असते. म्हणूनच सामान्यांच्या साध्या गप्पाटप्पांतही सुंदर शब्दचित्रे आकारास येत असतात.
लोकजीवनात लिखित व्यवहार अपवादात्मक आणि मौखिक व्यवहार श्वासप्रश्नासारखे चाललेले असतात. शाब्द सामुग्रीबरोबरच शाब्देतर कलात्म व्यवहार आपली प्रदेश विशिष्टता जोपासून असतात याचे भान ठेवूनच 'मौखिकता आणि लोकसाहित्य' या विषयावर बडोदा विद्यापीठाच्या सहकार्याने साहित्य अकादेमीतर्फे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
प्रस्तुत चर्चासत्रातील निबंध आणि विचारमंथन मौखिकता आणि लोकसाहित्याच्या विविध अंगांना स्पर्शन जाणारे असल्याने या चर्चासत्राची मौलिकता वाढली आणि हेच निबंध आता पुस्तकरुपाने इतर वाचकांसाठीही सहज उपलब्ध व्हावेत, म्हणूनच हे संकलन आणि संपादन.
(out of stock)
MRP ₹200 ₹160 (40₹ Discount)