(Marathi Lokgite : Sanskruti Abhyasachi Sadhane)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
महाराष्ट्राच्या लोकेतिहासाचे व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचे अव्वल साधन म्हणून लोकसाहित्याचे महत्त्व आता सर्वमान्य झाले आहे. महाराष्ट्र हा सातपुडा, सह्याद्रीच्या डोंगररांगात, तापी, नर्मदा, गोदा, कृष्णा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आणि कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ अशा खंडमंडळांमध्ये पसरलेला प्रांत आहे. अहिराणी, वऱ्हाडी, खानदेशी, माणदेशी, पावरी, भिलोरी, मावची अशा विविध बोलींची विविधता असलेला हा प्रांत आहे. जड पातळीवर महाराष्ट्रात भौगोलिक व नैसर्गिक विविधता असली तरी चेतन पातळीवर मात्र मराठी अस्मिता, लोकस्वभाव, लोकदैवते आणि लोकसंस्कृती यात अनेक समान दुवे आढळतात. विठोबा, खंडोबा, म्हाळसा, यहामोगी ही लोकदैवते महाराष्ट्रातील भावनिक ऐक्याची प्रतीके आहेत. लोकजीवनात धर्माचे सामाजिकीकरण कसे होते याचा प्रत्यय मराठी लोकगीतांच्या आविष्कार परंपरेतून व लोकगीतांच्या मौखिक संहितांमधून मिळतो. महाराष्ट्रात लोकगायनपरंपरेचे सामाजिक अभिसरण घडविणारी लोकोपासकांची संस्थात्मक व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यामुळे वैदिक-अवैदिक परंपरा, रामायण-महाभारताच्या आर्ष परंपरा आणि संतांच्या भक्तीपरंपरा पचवून मराठी संस्कृतीची जडणघडण कशी झाली याचा मागोवा घेण्यासाठी लोकगीतांइतके दुसरे अव्वल साधन नाही. या भूमिकेतून महाराष्ट्रातील विविध भागात व विविध बोलीत प्रचलित असलेल्या लोकगीतांचे प्रातिनिधिक संकलन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
(out of stock)
MRP ₹340 ₹270 (70₹ Discount)