(Marathi Dalit Kavita)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
मराठी दलित कविता हे गेल्या चार दशकातील मराठी दलित कवितेचे प्रातिनिधीक स्वरूप होय खऱ्या अर्थाने मराठी दलित कवितेची सुरुवात बरीच आधी झाली होती, परंतु दलित कवितेचे ते आधीचे स्वरूप काहीसे प्रचारकी होते, कारण त्याकाळी तिचा थेट संबंध दलितांच्या सामाजिक व राजकीय चळवळींशी होता. एकोणिसशे साठच्या दशकात सामाजिक परिवर्तनाच्या ज्या अनेक घटना घडल्या त्या घटनांचा परिणाम दलित कवितेवरही होऊन तिला वाङ्मयिन जगात स्वतःचे असे एक स्वतंत्र स्थान प्राप्त झाले त्यानंतर दलित कविता बहरत जाऊन ती वाङ्मयिन संकल्पनेच्या विविध स्तरांवर स्थिरावत गेली. आज ती भारतीय साहित्याचा अविभाज्य घटक बनली आहे.
प्रस्तुत संग्रहात समाविष्ट केलेले दलित कवि व त्यांच्या कविता समग्र दलित कवितेचे वाङ्मयिन मूल्य ठरविण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास वाटतो. नामदेव ढसाळ, दया पवार ते हीरा बनसोडे, ज्योती लांजेवार ते दामोदर मोरे, राम दोतोंडे ते सध्या लिहीत असलेले उत्तम अंभोरे व मंगेश बनसोड या सर्वांच्या कवितांमधून दलित कवितेच्या सर्वसमावेशक प्रातिनिधिक विषयांचे आकलन होऊन साहित्य अकादेमीतर्फे प्रकाशित झालेला दलित कवितेचा हा प्रातिनिधिक संग्रह समकालीन भारतीय साहित्य संदर्भात मोलाची भर घालेल याविषयी शंका नसावी.
बी. रंगराव दलित कवींच्या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असून त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद, अस्मितादर्श आदि संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बी. रंगराव यांनी काही काळ जर्मनीत वास्तव्य केले असून तेथील विद्यापीठात 'भारतीय इंग्रजी कविता' या विषयावर व्याख्याने दिली आहेत. सध्या ते मुंबई विद्यापीठातील इंग्रजी विभागात इंग्रजी वाङ्मयाचे प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
(out of stock)
MRP ₹125 ₹100 (25₹ Discount)