(Hi Veena Prachin)
लेखक : ओ. एन. व्ही. कुरूप
प्रकाशन : साहित्य अकादमी
आधुनिक मल्याळम काव्यपरंपरेतील ज्येष्ठ कवी ओएनव्ही कुरूप हे कवींमधले मानवतावादी व मानवतावाद्यांमधले कवी म्हणून ओळखले जातात. मार्क्सवादी आणि गांधीवादी विचारातून आपल्या अगाध करूणेचे आणि मानवतेचे सातत्य राखत त्यांनी आपल्या प्रत्येक कवितेत सौंदर्यानुभूतीच्या अनोख्या क्षेत्राचा आणि विश्वमानवाचा शोध घेतला.
सामान्य माणसांच्या जाणिवा, पर्यावरणाविषयी आस्था, अभिजात अभिरूचीचे संस्कार, लोककाव्याची देशीयता, नैसर्गिक मानवतावादाचे तत्वज्ञान, विश्वात्मकतेची ओढ आणि तरीही आपल्या केरळीय संस्कृतीतून जगाकडे पाहण्याचा आग्रह यातून ओएनव्हींची जीवनदृष्टी आणि काव्यदृष्टी निर्माण झालेली आहे. भारतीय कवि -प्रतिभेचे हे दुर्मिळ असे सृजन आहे.
१९७१ या वर्षी केरळ साहित्य अकादमीचा आणि १९७७ या वर्षी साहित्य अकादेमीचा पुरस्कार त्यांना मिळाला. वायलार, सोव्हीएत लँड नेहरू, भारतीय भाषा परिषद, महाकवी उल्लूर आसन स्मृती, महाकवी कवारम जोशुआ, महाकवी पी. कुन्हीरामन नायर, महारती जी. शंकर कुरूप, महाकवी वेष्णीकुलम् आदि पुरस्कारांबरोबरच २००७ मध्ये त्यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. पद्मश्री नंतर आता २०११ मध्ये त्यांना 'पद्मविभूषण' पदवीनेही सन्मानित करण्यात आले आहे.
ही वीणा प्राचीन ही ओएनव्ही कुरूप यांच्या कवितांच्या तेवीस काव्यसंग्रहातून निवडलेल्या इंग्रजी भाषांतराच्या ए. जे. थॉमस यांनी विस्तृत विवेचनासह केलेल्या संपादनाचा मराठी अनुवाद आहे.
(out of stock)
MRP ₹175 ₹140 (35₹ Discount)