कवितासंग्रह , अनुवादित

हे तन्मय धुळी

(He Tanmay Dhuli)

लेखक : प्रतिभा सत्पथी

प्रकाशन : साहित्य अकादमी

तन्मय धुळी हा साहित्य अकादेमीने पुरस्कृत केलेल्या ह्याच नावाच्या ओडिया कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद आहे. या कवितासंग्रहात एकूण छत्तीस कविता आहेत. ह्या कवितांमध्ये काव्यात्मक दृष्टी आणि 'स्व'चा घेतलेला शोध स्पष्टपणे दिसतो, अनुभवास येतो. ह्या कवितांमध्ये अनके दृष्टांत देऊन वैयक्तिक निरर्थकता मांडली आहे. आणि आध्यात्मिक विचारांचा सहजपणे सरळ सोप्या भाषेत संदेश दिलेला आढळतो. म्हणूनच ह्या कवितांचे महत्त्व अधिक आहे.

तन्मय धुळीच्या समर्थ कवियत्री प्रतिभा सत्पथी ह्यांचा जन्म कटक, ओडीसा इथे 1945 साली झाला. त्यांनी ओडीया भाषा आणि साहित्यात एम.ए. व पीएच.डी. केली आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आपल्या लिखाणाला सुरुवात केली. त्यांचे दहा कविता संग्रह, पाच निबंध आणि सात अनुवाद प्रकाशित झाले आहेत. दोन कविता संग्रहांचा हिंदी भाषेत अनुवाद झाला आहे. ओडिया साहित्यातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना विषुव पुरस्कार, साहित्य अकादेमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे.

(out of stock)

MRP ₹125 ₹100 (25₹ Discount)