कवितासंग्रह , अनुवादित

धुकं जसं दऱ्यांमधून

(Dhuka Jasa Daryanmadhun)

लेखक : एच. एस. शिवप्रकाश

प्रकाशन : साहित्य अकादमी

एच्. एस्. शिवप्रकाश (1954-) हे कन्नड कवी, नाटककार, समीक्षक, अनुवादक, स्तम्भलेखक, रंगकर्मी इत्यादी अनेक नात्यांनी भारतात आणि विदेशात प्रख्यात आहेत. कन्नडशिवाय ते इंग्रजीतही लेखन करतात. आत्तापर्यंत त्यांचे 9 कवितासंग्रह, 13 नाटके, 4 समीक्षाग्रंथ प्रकाशित असून अनेक इंग्रजी ग्रंथही भारतात व विदेशात प्रकाशित झालेले आहेत. त्यांची कविता व नाटके आध्यात्मिकता, सामाजिक बांधिलकी व व्यक्तिस्वातंत्र्य, नवी सर्जनशील भाषा आणि अनोख्या लयींसाठी नावाजलेली आहेत. त्यांच्या कविता व नाटकांचे अनेक भारतीय भाषांत व इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश व इटालियनमधे अनुवाद झालेले आहेत. कन्नड साहित्याला आधुनिकतेच्या पुढची वाट दाखवणाऱ्या शिवप्रकाशांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे; त्यात संगीत नाटक अकादमी (1997), साहित्य अकादेमी (2012), यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. साहित्य अकादेमीच्या इंडियन लिटरेचर चे संपादन, बर्लिनच्या भारतीय ओम्बसीच्या टागोर केंद्राचे निदेशक, आयोवाच्या आंतर्राष्ट्रीय लेखन कार्यशाळेतील काही काळ वास्तव्यानंतर ते दिल्लीच्या जे. एन्. यू मधील स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थटिक्सचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त झालेले आहेत. 

(out of stock)

MRP ₹135 ₹105 (30₹ Discount)