कवितासंग्रह , लोकगीते

बोलीभाषेतील आदिवासी कविता

(Bolibhashetil Adivasi Kavita)

लेखक : -

प्रकाशन : साहित्य अकादमी

आदिवासींचे विश्व हे हे अनेक बोलीभाषांचे आगार आहे त्यात गोंडी, माडिया, कोलामी, कोरकू, भिल्ली, हलबी, पावरी, देहवाली, संथाली, मुंडारी, कुडूख व इतरही बोलीभाषा या अत्यंत प्राचीन, प्रादेशिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या व निसर्गसौंदर्याचा पदर डोईवर घेतलेल्या बोलीभाषा आहेत. आदिवासींनी जतन केलेले, त्यांच्या पिढ्या-पिढ्यातून अव्याहतपणे येथवर झिरपत आलेले व त्यांच्या जीवनानुभूतीचा स्पर्श-गंध घेऊन अवतरलेले त्यांचे पारंपरिक लोकसाहित्य याच वोलीभाषामधून प्रगटले आहे. त्यांच्या वाट्याला शतकानुशतके आलेल्या घोर उपेक्षेचे भान व त्यांच्या पृथगात्म अस्तित्वाचे स्मरण जागते ठेवणे हे केवळ आदिवासींचेच नव्हे तर सर्व भारतीयांचे दायीत्व आहे.


प्रस्तुत कवितासंग्रह हा या दिशेने झालेली स्तुत्य वाटचाल आहे. या संग्रहात समाविष्ट कवी सर्वश्री विठ्ठलसिंग धुर्वे, वाहरु सोनवणे, वसंत कनाके, विश्राम वळवी, विरा राठोड हे काव्यजगतातील प्रतिभावान कवी असून इतरही कवींचे कवितालेखन सुरु आहे. या कवींच्या मातृभाषेतील * कवितांमधून आदिवासींच्या बोलीभाषांचे स्वरुप, अंतरंग व त्यांची शब्दश्रीमंती यांचे दर्शन तर होईलच, परंतु त्यांच्या वाङ्‌मयीन वैभवाचीही रसिकांना साक्ष पटेल. साहित्य अकादेमी तर्फे प्रकाशित झालेला आदिवासी बोलीभाषेतील हा प्रातिनिधिक कवितासंग्रह समकालीन भारतीय साहित्यात आपल्या वेगळेपणाची मुद्रा ठोकून जाईल असा विश्वास वाटतो.

(out of stock)

MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)