(Bhillanch Bharat)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
गुजराती लोकसाहित्याचे जनक झवेरचंद मेघानी यांचे लोकसाहित्याच्या समृद्ध परंपरेच्या जतनात अत्यंत मोलाचे योगदान आहे. त्याच प्रेरणेतून लोकसाहित्याचा हा वारसा समर्थपणे अनेक अभ्यासकांनी, संशोधकांनी पुढे नेला. आदिवासी लोकजीवन, साहित्य, संस्कृती, भाषा, सामाजिक इतिहासाच्या वैभवशाली परंपरेच्या, संशोधनाच्या, संपादनाच्या मौलिक कार्याचा वारसा भगवानदास पटेल यांनी निष्ठापूर्वक पुढे नेला आणि आजही नेत आहेत. आदिवासी समाजात प्रत्यक्ष दीर्घकाळ राहून लोप पावत असलेल्या मौखिक परंपरेतील वाणीला सहवास, संवाद, निरीक्षणातून भगवानदास पटेलांनी शब्दबद्ध केलं. लोकमहाकाव्याचं मर्म जाणून घेण्यासाठी मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, सामाजिक इतिहास, पुराकथा या महाकाव्याच्या विविध पैलूंचा आंतरशाखीय दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा. महाकाव्याच्या सम्यक आकलनासाठी तो आवश्यक आहे. प्रस्तुत भिल्लांचं भारत या महाकाव्यातून लोकसाहित्याचं मर्म जाणून घेणं भगवानदास पटेल यांच्या संशोधनाचं प्रयोजन आहे.
(out of stock)
MRP ₹325 ₹260 (65₹ Discount)