कथासंग्रह , अनुवादित

भग्नमूर्तींच्या सान्निध्यात

(Bhagnamurtinchya Sannidhyat)

लेखक : सलाम बिन रज्जाक

प्रकाशन : साहित्य अकादमी

उर्दू कथा साहित्यातील १९७० नंतर आलेल्या कथाकारांच्या कथायुगास 'आधुनिकोत्तर' म्हटले जाते. या पिढीतील अग्रगण्य नाव सलाम बिन रज्जाक हे होय. यापूर्वीच्या कथायुगात प्रतिकात्मक, रूपकात्मकतेचा अत्याधिक अंतर्भाव होता, त्यामुळे ती अमूर्ततेत साकारत असंप्रेषणीय होत गेली, तिने वाचनीयता गमावली. अशात विशेषतः सलाम बिन रज्जाक व त्यांच्यासह १९७० नंतरच्या कथाकारांनी कथ्याला प्राधान्य देत संपूर्ण कथाच प्रतिकात्मक, रूपकात्मक बनवीत वाचनीय बनविली. सलाम बिन रज्जाक हे मूलतः मराठी प्रांताचे तसेच भारतीय मिथकांचे सखोल अभ्यासक आहेत. जी. ए. कुलकर्णीच्या कथांचा त्यांच्यावर गहरा प्रभाव जाणवतो. समकालीन मानवी जीवन संघर्ष, वैचारिक द्वंद यांचे मनोविष्लेषणात्मक व तर्कनिष्ठ विवेचन त्यांच्या कथेत सहजपणे साकारते. अनेक पुरस्कारांनी अलंकृत या ज्येष्ठ कथाकाराच्या कथांची उर्दू तथा अन्य भाषेतील समीक्षकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

(out of stock)

MRP ₹250 ₹200 (50₹ Discount)