विश्वकवी रवींद्रनाथ ठाकुर यांच्या जन्माला सन १९६१ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या जन्मशताब्दि महोत्सवाच्या निमित्ताने साहित्य अकादेमीने त्यांचे प्रतिनिधिक स्वरूपाचे वाङ्मय - एकूण आठ ग्रंथ - निरनिराळ्या भारतीय भाषांत भाषांतर करून प्रकाशित करण्याचा कार्यक्रम योजिला होता. त्यांपैकी, बाल-साहित्य हा आठवा ग्रथ.
रवींद्रनाथांच्या अथांग साहित्य-सागरातील काही सुदर रत्नांची निवड व संकलन करून 'विश्वभारती' ने बाल-साहित्य हा ग्रंथ निर्माण केला. त्याचा मूळ पंगालीवरून केलेला हा मराठी अनुवाद. यांतील नाटिका महाराष्ट्रातील मुला-मुलींना रंगभूमीवर करून दाखविता येतील, आणि कवितांचा अनुवाद काव्यातच केलेला असल्याने ती काव्ये म्हणून त्यांतील नादमाधुर्यादि प्रासादिक सौंदर्याचा अस्वाद लुटता येईल.