(Artificial intelligence)
लेखक : नीलांबरी जोशी
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
या पुस्तकात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा निरनिराळ्या क्षेत्रांमधला वापर, त्यामुळे सुटणारे आणि त्याचबरोबर त्यातून निर्माण होणारे प्रश्न यांचे नेमके विवेचन मुद्देसूदरीत्या आणि दाखले देऊन नीलांबरी जोशी यांनी केले आहे. तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे क्षेत्र फक्त नोकऱ्या जातील का ? इतक्याच विषयापुरतं मर्यादित नसून माणसाचे भावविश्व, समाजकारण, नीतिमत्ता अशा अनेक गोष्टींशी कसे घट्टपणे जोडले गेलेले आहे याची नेमकी उकलही यातल्या प्रकरणांमधून होते.
जनरेटिव्ह एआय, चॅट जीपीटी यांच्यासारख्या अतिशय ताज्या विषयांचा आढावा घेतलेला असल्यामुळे या पुस्तकाला विशेष संदर्भमूल्यही आहे असे नमूद करावेसे वाटते. आपल्या मराठीमध्ये ते असल्यामुळे त्याचे महत्त्व अर्थातच खूप जास्त आहे.
- अतुल कहाते
(माहितीतंत्रज्ञ आणि लेखक)
(out of stock)
MRP ₹350 ₹295 (55₹ Discount)