कथासंग्रह

अंतर्बाह्य

(Antarbahya)

लेखक : रत्नाकर मतकरी

प्रकाशन : मनोविकास प्रकाशन

... गूढकथा ही अनेक स्तरांवर पटण्याजोगी, मूलतः चांगली लिहिलेली कथा, दर्जेदार साहित्य असायला हवी.

सर्वप्रथम ती, पात्रे, प्रसंग, मांडणी, त्यामागील आशय, वातावरण, भाषाशैली या सर्वच दृष्टींनी एक परिपूर्ण कथा असावी लागते. मानवी जीवनातील गूढता सांगणे, हे तिचे कार्य असते. त्याला पोषक अशी तिची निवेदनशैली असावी लागते.

... गूढकथा दर्जेदार ठरण्यासाठी, ती स्वतंत्र हवी. याचे कारण असे, की चांगल्या कथेत जे असते, ते चांगल्या गूढकथेतही यायला हवे, ते काय, तर लेखकाचे व्यक्तिमत्त्व ! दुसऱ्या व्यक्तीविषयी आणि एकूण मानवसमाजाविषयीच्या त्याच्या भावना, त्याच्या स्वभावातील सहानुभूती, करुणा इत्यादी भाव, त्याचा प्रामाणिकपणा, या साऱ्या गोष्टी स्वतंत्र कथेतच उतरू शकतात.

...माझ्या व्यक्तिमत्त्वात कालांतराने होत गेलेल्या बदलाप्रमाणे माझी कथाही हळूहळू बदलत गेली. तिच्यातला सामाजिक आशय हा अधिकाधिक ठसठशीत होत गेला... सामाजिक आशयाबरोबरच मी, गूढता कशाकशात असते अत्यंत गूढ याचाही समांतर शोध चालूच ठेवला, काळ ही गोष्ट अत्यंत आहे. माझ्या काही कांत काळ उलटासुलटा करून पाहिलेला आहे. पर्यायी विश्व, याही कल्पनेशी मी खेळलो आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक बाजू मला आकर्षित करतात. मनुष्याचे व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य कसे बदलते, हा माझ्या निरीक्षणाचा एक विषय असतो.

(out of stock)

MRP ₹250 ₹215 (35₹ Discount)